ई लर्निंग उपक्रम उद्घाटन मासरूळ

ई लर्निंग कार्यक्रम जि प शाळा मासरूळ
           



         आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पर्वावर  जि. प. मराठी प्रा. शाळा मासरुळ ( पं. स.बुलडाणा) येथे  ग्रामपंचायत मासरुळ यांच्या सहकार्यातून शाळेला ई-लर्निंग साठी तीन स्मार्ट अँड्रॉइड led tv संच देण्यात आले.  याप्रसंगीच्या उदघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. ज्योतिताई लांडे पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य श्री दिलीपभाऊ सिनकर तसेच सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.  शाळेचे स. शि. श्री श्रीराम भुते यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचलन केले तर स. शि. श्री शाम चिंचोले यांनी म.गांधी व शास्त्रीजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत ई लर्निंगची शैक्षणिक क्षेत्रातील आवश्यकता महत्व व त्याचा अध्यापनात वापर याची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतिने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

या प्रसंगीची काही क्षणचित्रे




सर्वप्रथम महात्मा गांधी जयंती निमित्त व स्वच्छता अभियानाअतंर्गत गावातून जनजागृतिपर प्रभातफेरी काढण्यात आली.


शाळेमध्ये उपस्थित मान्यवरानी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री यांना अभिवादन केले.







याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.








गावच्या सरपंचा सौ. ज्योतिताई लांडे पाटिल यांच्या हस्ते ई लर्निंग tv संचाचे उद्घाटन करण्यात आले .



कार्यक्रमाचे संचलन श्री श्रीराम भुते यांनी केले.


श्री श्याम चिंचोले यांनी ई लर्निंग चे शैक्षणिक महत्व त्याचे उपयोग याविषयी सविस्तर माहिती दिली.





सदर ई लर्निंग उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतिस  लाभकारी ठरेल व आनंददायीं कृतियुक्त शिक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावनिने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न निश्चितपने पूर्ण होईल .

धन्यवाद
सर्व शिक्षकवृंद जि. प. शाळा मासरूळ

No comments:

Post a Comment