चित्रकला उपक्रम

चित्रकला उपक्रम









"कला ही सृजनशीलतेची प्रथम ओळख आहे."  - शेक्सपिअर

" कलेची जोपासना जीवनाला पूर्णत्वाकडे नेते." - कुसुमाग्रज

           वरील उक्तीप्रमाणेच शालेय जीवनात त्यातही प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावरविद्यार्थ्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण शाळेत विविधउपक्रम राबवित असतो, जि प शाळा मासरुळ येथे कला विकासासाठी राबविण्यातयेणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे दुपारच्या दीर्घ विश्रांतीच्या काळात घेतलाजाणारा एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणजे  बोलूया चित्रातून .
       दुपारच्या दीर्घ विश्रांतीच्या वेळेत शाळेतील शिक्षिका कु. शिंदे मॅडम विद्यार्थ्यांना प्रेरक असे 
चित्र रेखाटतात त्याला अनुसरून विद्यार्थी  विविध प्रकारची चित्रे रेखाटतात .

★ उपक्रमाचे नाव :-  बोलूया चित्रातून   


★उपक्रमाची वेळ :- दुपारची दीर्घ विश्रांती   


★उपक्रमाचे स्वरूप :-        

◆  साजरे केले जाणारे विविध सण उत्सव यावर   आधारित चित्रे काढणे

◆  'बेटी बचाव बेटी पढाव' ,  'स्वच्छ शाळा '  ' वृक्ष संवर्धन' यासारख्या  सामाजिक विषयावर आधारित चित्रे काढणे.

◆   मुलांच्या भावविश्वावर राज्य करणाऱ्या कार्टून चे चित्र काढणे.

◆   राष्ट्रीय सणांच्या दिवशी प्रेरणादायी फलकलेखन .


★उपक्रमाची उद्दिष्ट्ये:-         

◆   विद्यार्थ्यांत कलेची आवड निर्माण करणे. 

◆    सृजनशीलतेला चालना देणे .

◆    सामाजिक जाणिव जागृती करणे   


  ★उपक्रम संयोजक :-         

◆कु. सुनीता शिंदे  मॅडम  ◆ कु. पल्लवी पिंगळे मॅडम  

   या शालेय उपक्रमाची काही निवडक चित्रे -































































शाळेत राबविल्या जाणारा हा उपक्रम आपणास निश्चितच आवडला असेल .
धन्यवाद ! 





No comments:

Post a Comment