ज्ञानरचनावादि उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम

 मित्रानो  नमस्कार मी शाम  चिंचोले सहायक शिक्षक जि  प शाळा मासरूळ 

     प्रत्येक शिक्षकाला प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करत असताना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असते . त्यात प्रामुख्याने भेडसावणारी समस्या म्हणजे अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करताना कोणते उपक्रम राबवावे  कश्या प्रकारे अप्रगत मुलांना प्रगत करावे या बाबत आपला सर्वांचाच गोंधळ उडालेला असतो . 
पुढे असेच काही उपक्रम दिलेले आहेत ज्याचा उपयोग आपल्याला प्र्त्यक्ध वर्ग अध्यापनात करता येईल व आपले अप्रगत विद्यार्थी प्रगत होण्यास याचा निश्चितच लाभ होईल .
ज्ञानरचनावादी उपक्रम
��ज्ञानरचनावादी उपक्रम ��
माझी शाळा माझे उपक्रम भाग- 5
उपक्रम :  " जादूई पेटारा ज्ञान कुंभ"
कृती :
�� प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे.
�� त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे..
��त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे.
��एक एक  विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे
�� चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे.
�� मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे.
��ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे.
�� प्रत्येक  विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे .
�� हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास
दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो.
����������������
उपक्रमांची यशास्विता.....
�� विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
�� विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते .
�� विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो.
�� मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते .
�� विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
�� दिवसभराच्या अभ्यासाचा शीण घालवता येतो..
�� अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते .
�� प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात .
������������������
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
������������������
��मनोरंजक मोफत खेळातुन शिक्षण��
➖➖➖➖Ⓜ����➖➖➖
�� चढता उतरता क्रमाची लगोरी  ��
साहित्य -
शाळेतील लगोरी संच
कृती -
लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात  १०,२०,३०,४०,५०....अशा प्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने  ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील.
नियम -
१)  लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात.
२) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो.
३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील.
४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील.
५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील.
६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार.
७) ज्या टिमची लगोरीचा क्रमां चढता

मराठी 

 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. २)शब्दभेंड्या खेळ घेणे
. ३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे. ३)समान अक्षर जोड्या लावणे.
 ४)शब्दांची आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
 ६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
 ७)बाराखडीवाचन करणे
. ८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे
. १०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
 ११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे
. १३)चिठठीलेखन करणे. 
१४)संवादलेखन करणे. 
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. 

गणित

 १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे 
२)वर्गातील वस्तु मोजणे
 ३)अवयव मोजणे
 ४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
 ५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
 ६)आगगाडी तयार करणे
 ७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे. 
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे
. ९)अंकाची गोष्ट सांगणे.
 १०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे. 
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
 १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे. 
१३)बेरीजगाडी तयार करणे. 
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे 
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे 
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे. 
१७)वस्तु निवडणे 
१८)पाणी पाटी
 १९)अक्षर देवून शब्द तयार करणे 
२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे
 २१)शब्दकोडे सोडवणे
 २२)अक्षरगाडी उदा. कप ,पर ,रवा ,वात ई.
 २३)श्रुत लेखन सराव 
२४) अंकाच्यागाड्या
 २५)सम ,विषम संख्याच्या गाड्या 
२६)सुलभबालवाचन सराव
 २७)स्मरणावर आधारीत खेळ
 २८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे



वरील प्रमाणे उपक्रम  राबवून आपण अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे . तुमच्या व तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या  शुभेच्छा. 

धन्यवाद 

शाम अरुण चिंचोले 
सहाय्यक शिक्षक 
जि प मराठी प्राथ . शाळा मासरूळ 

No comments:

Post a Comment