शाळेचे बोलके अंगण

शाळेचे बाह्य रूप लहानग्यांना आकर्षित करणारे तसेच शिक्षणाची गोडी लावणारे असावे या बाबत आम्ही प्रयत्नरत राहलो आहोत त्यासाठी आमच्या कल्पनेतून शालेय परिसरात निर्माण केलेले आमचे मुक्तांगण

धुळपाटी

लहान असो किंवा मोठे प्रत्येकाचीच सहजवृत्ती असते काहींना काही रेखाटत राहण्याची याचाच उपयोग धुळपाटीत करून विद्यार्थ्याना शाळेच्या अंगणात धुळपाटी उपलब्ध करून दिलेली आहे मुले सुट्टीत येतात अक्षरे गिरवतात

शब्द समृद्धी

सुट्टीतही मुलांना काहींना काही वाचनासाठी साहित्य उपलब्ध असावे यासाठी शब्द समृद्धी उपक्रम सुरु केला आहे मुले येतात परडीतील शब्द वाचतात आपसात चर्चा करतात


स्वागत 
शाळेत प्रवेश करता क्षणीच मुले असोत व पालक त्यांची दृष्टीस चांगले विचार पडोत व सुरवात चांगल्या विचारानी घडो या साठी शाळेची  प्रवेश  रचना खालील प्रमाणे केली आहे


वर्तमानपत्र वाचन
विद्यार्थी दशेतच मुलांना वर्तमानपत्र वाचनाची सवय रुजावी त्यांना समाजाबद्दल त्यातील घडामोदींबद्दल जाणून घेऊन सजग राहण्याची सवय लागावी यासाठी शालेय परिसरात वर्तमानपत्र वाचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे मुले येतात वाचतात चर्चा करतात

वाचन समृद्ध अंगण

मुलांना मुक्त वातावरणात वाचनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वनिर्मित वाचन कार्डद्वारे  वाचन मुक्तांगण निर्माण केले आहे


आमच्या या छोट्याश्या प्रयत्नांना आमचे शाळेतील विद्यार्थी स्कारात्मकप्रतिसाद  देत आहेत व त्यामुळे अजून नवीन काहींकरण्याचा हुरूप आहे। आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हास आवडला असेल हि अपेक्षा .😊😊😊😊☺☺

2 comments:

  1. मी दिनांक २८/०३/२०१६ ला नवोपक्रमशील शाळा अभ्यास दौरा (शिक्षणाची वारी)अंतर्गत आपल्या शाळेला भेट दिले असता तुमच्या शाळेतील नावोपक्रमाची सखोल माहिती व मार्गदर्शन मिळाले.आपली शाळा आणि आपले सहकार्य यामुळे मला एक नविन दिशा मिळाली.आपला शतशः आभार..........

    ReplyDelete