स्वच्छ भारत -चित्रकला स्पर्धा

 स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जि प शाळा मासरुळ येथे स्वछता पंधरवडा साजरा करण्यात आला . या निमित्त शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे स्वछता ही थीम ठेऊन आयोजित केलेली बाल चित्रकला स्पर्धा .

या उपक्रमासाठी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री श्रीराम भुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची रुपरेषा आखण्यात आली. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कु. सुनीता शिंदे यांनी सर्व वर्गाच्या मुलांची विशेषतः वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्याचीही या उपक्रमासाठी तयारी करून घेतली.  
त्याचप्रमाणे उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक शिक्षक श्री श्याम चिंचोले यांनी विशेष प्रयत्न केले. 
सदर उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. 

उपक्रमशील शिक्षिका कु. सुनीता शिंदे  यांनी स्वछता मिशन यावर आधारित आदर्श फलकचित्र रेखाटले.

सदर उपक्रमाची काही क्षणचित्रे




























या सहशालेय उपक्रमातून मुलांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांच्यात कलेची आवडही निश्चितच निर्माण होईल . सदर उपक्रम आपणास निश्चितपणे आवडला असेल. 
धन्यवाद !

No comments:

Post a Comment