Tuesday, December 29, 2015

शाळेचे बोलके अंगण

शाळेचे बोलके अंगण

शाळेचे बाह्य रूप लहानग्यांना आकर्षित करणारे तसेच शिक्षणाची गोडी लावणारे असावे या बाबत आम्ही प्रयत्नरत राहलो आहोत त्यासाठी आमच्या कल्पनेतून शालेय परिसरात निर्माण केलेले आमचे मुक्तांगण


धुळपाटी

लहान असो किंवा मोठे प्रत्येकाचीच सहजवृत्ती असते काहींना काही रेखाटत राहण्याची याचाच उपयोग धुळपाटीत करून विद्यार्थ्याना शाळेच्या अंगणात धुळपाटी उपलब्ध करून दिलेली आहे मुले सुट्टीत येतात अक्षरे गिरवतात

शब्द समृद्धी

सुट्टीतही मुलांना काहींना काही वाचनासाठी साहित्य उपलब्ध असावे यासाठी शब्द समृद्धी उपक्रम सुरु केला आहे मुले येतात परडीतील शब्द वाचतात आपसात चर्चा करतात

स्वागत 

शाळेत प्रवेश करता क्षणीच मुले असोत व पालक त्यांची दृष्टीस चांगले विचार पडोत व सुरवात चांगल्या विचारानी घडो या साठी शाळेची  प्रवेश  रचना खालील प्रमाणे केली आहे


वर्तमानपत्र वाचन

विद्यार्थी दशेतच मुलांना वर्तमानपत्र वाचनाची सवय रुजावी त्यांना समाजाबद्दल त्यातील घडामोदींबद्दल जाणून घेऊन सजग राहण्याची सवय लागावी यासाठी शालेय परिसरात वर्तमानपत्र वाचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे मुले येतात वाचतात चर्चा करतात


वाचन समृद्ध अंगण

मुलांना मुक्त वातावरणात वाचनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वनिर्मित वाचन कार्डद्वारे  वाचन मुक्तांगण निर्माण केले आहे



शालेय परिसर अधिकाधिक विद्यार्थिभिमुख करून तो बोलका करून तो शालेय उपक्रमांशी सुसंगत बनविण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आपणास नक्कीच आवडला असेल हीच अपेक्षा

Monday, December 28, 2015

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द
अनाथ = पोरका
अपघात = दुर्घटना
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अंगण = आवार
अपराध = गुन्हा, दोष
अपाय = इजा
अंत = शेवट
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अश्रू = आसू
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आशीर्वाद = शुभचिंतन
इलाज = उपाय
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सन, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
किल्ला = गड, दुर्ग
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
खण = कप्पा
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव
नदी = सरिता
नजर = दृष्टी
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच
नोकर = सेवक
परिश्रम = कष्ट, मेहनत
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा
प्राण = जीव
पान = पत्र, पत्ता
प्रासाद = वाडा
पाखरू = पक्षी
प्रार्थना = स्तवन
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पाऊस = वर्षा, पर्जन्य
पाणी = जल, नीर, तोय, उदक
पिशवी = थैली
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा
फलक = फळा
फांदी शाखा
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर
भेदभाव = फरक
भोजन = जेवण
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा
मानवता = माणुसकी
मान = गळा
मंगल = पवित्र
मंदिर = देऊळ, देवालय
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मुलगा = पुत्र, सुत, तनय
मुलगी = कन्या, तनया
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन
मुख = तोंड, चेहरा
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता
युक्ती = विचार, शक्कल
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर
योद्धा = लढवय्या
रक्त = रुधिर
रणांगण = रणभूमी, समरांगण
र्हास = हानी
राग = क्रोध, संताप, चीड
राजा = नरेश, नृप
राष्ट्र = देश
रांग = ओळ
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा
रेखीव = सुंदर, सुबक
लग्न = विवाह, परिणय
लाट = लहर
लाज = शरम,
लोभ = हाव
वस्त्र = कपडा
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
विरोध = प्रतिकार
विसावा = विश्रांती, आराम
विश्व = जग, दुनिया
वीज = विद्युर, सौदामिनी
वृत्ती = स्वभाव
वृद्ध = म्हातारा
वैराण = ओसाड, भकास, उजाड
वैरी = शत्रू, दुष्मन
वैषम्य = विषाद
व्यवसाय = धंदा
व्याख्यान = भाषण
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस
शहर = नगर
श्वापद = जनावर
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
शाळा = विद्यालय
शेत =
शिवार, वावर, क्षेत्र
शिवार = शेत, वावर
शीण = थकवा
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार
शिक्षा = दंड, शासन
श्रम = कष्ट, मेहनत
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा
सफाई = स्वच्छता
सवलत = सूट
सजा = शिक्षा
सन्मान = आदर
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ
सावली = छाया
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा
स्तुती = प्रशंसा
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज
स्फूर्ती = प्रेरणा
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सावली = छाया
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा
सिनेमा = चित्रपट, बोलपट
सुविधा = सोय
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
सोने = सुवर्ण, कांचन, हेम
सोहळा = समारंभ
हद्द = सीमा, शीव
हल्ला = चढाई
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
हात = हस्त, कर, बाहू
हाक = साद
हित = कल्याण
हिंमत = धैर्य
हुकूमत = अधिकार
हुरूप = उत्साह
हुबेहूब = तंतोतंत
हेका = हट्ट, आग्रह
क्षमा = माफी

Saturday, December 26, 2015

ज्ञानरचनावाद उपक्रम

इ.1ली

१लीसाठी ज्ञानरचनावादी उपक्रम

वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
ज्ञानरचनावाद दूतांसाठी खास+++
वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.
वाचन पुर्वतयारी—
१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह=उपक्रम.
१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.
२.) वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या. तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.
सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस.
३.)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.
४) दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे. हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
अक्षर परिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा. आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा. आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
अक्षर दृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.
दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.
स्वरचिन्ह परिचय-
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
वाक्यवाचन—
मुले शब्द तयार करु लागली की छोट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत. प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत. मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.
जोडाक्षराचे वाचन—
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.
र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन—
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
प्रकटवाचन—
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा. शिक्षकांमागोमाग एक एक वाक्य विद्यार्थी वाचतील. पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन—
शब्द डोंगर वाचन घेणे. अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

Tuesday, December 22, 2015

गणितातील महत्वाच्या संकल्पना

गणितातील सुञे

गणित : महत्त्वाची सूत्रे

=> मूळसंख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ ने
पूर्ण भाग जाणारी सw ंख्या,

=> समसंख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

=> विषमसंख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,

=> जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ
२ चा फरक असतो,

=> संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक
संख्या.

=> संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.

=> एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर
दोन अंकी ९०,
तीनअंकी ९०० आणि
चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.

=> ० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.

=> १ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण
संख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या
प्रत्येकी १८ संख्या असतात.

=> दोन अंकांमधून एकूण २ संख्या,
तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,
चार अंकांमधून एकूण २४ संख्या व
पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

=> विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -
संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी
कोणताही अंक असल्यास.

B)३ ची कसोटी-
संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष
भाग जात असल्यास.

C)४ ची कसोटी-
संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्या
संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यास
अथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्य
असल्यास.

D)५ ची कसोटी-
संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५
असल्यास.

E)६ ची कसोटी-
ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग
जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोच
किंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३
ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

F)७ ची कसोटी-
संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार
होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या
अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून
आलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या
संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

G)८ ची कसोटी-
संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी
तयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेष भाग जात
असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३
शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग
जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंक
असतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८
ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

H)९ ची कसोटी-
संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेष
भाग जातो.

I)११ ची कसोटी-
ज्या संख्येच्या विषम स्थानच्या
या समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्या
पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग
जातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते
किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

J)१२ ची कसोटी-
ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो
त्या संख्येला १२ ने भाग जातो.

K)१५ ची कसोटी-
ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातो
त्या संख्येला १५ ने भाग जातो.

K)३६ ची कसोटी-
ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष
भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

L)७२ ची कसोटी-
ज्या संख्येला ९ व ८ ने निशेष
भाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान
संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या

=> मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने
(विभाजकाने) भाग जातो ती संख्या

=> प्रमाण भागिदारी

A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×
मुदतीचे गुणोत्तर,

B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+
मुदतीचे गुणोत्तर,

C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.

=> गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =
गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५

B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =
गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷
ताशी वेग × १८/५

C) गाडीचा ताशी वेग=
कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×
१८/५

D) गाडीची लांबी=
ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा
वेळ × ५/१८

E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग
× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८

F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ
काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने
गुणा

G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=
नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्या
 विरुद्ध दिशेने ताशी वेग  ÷ २

=> सरासरी
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीज
भागिले X

B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.

C) X संख्यामान दिल्यावर ठराविक
संख्यांची सरासरी =
(पहिली संख्या+शेवटची संख्या)  ÷ X

D) X या क्रमश: संख्याची बेरीज =
(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X ÷ २

=> सरळव्याज

A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००

B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत

C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत

D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर

=> नफा-तोटा
A)नफा =विक्री- खरेदी,

B)विक्री = खरेदी + नफा,

C)खरेदी = विक्री+ तोटा,

D)तोटा = खरेदी - विक्री

E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १०० ÷ खरेदी

F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी

G)विक्रीची किंमत = खरेदीची किंमत ×(१००+
शेकडा नफा) ÷१००

H)खरेदीची किंमत =
(विक्रीची किंमत ×१००)÷
(१००+ शेकडा नफा)

वर्तुळ :

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्याे रेशखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
 वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या  व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.

 वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्याा रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

 व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
 वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
 वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7

 अर्धवर्तुळाची त्रिज्या  = परिमिती × 7/36
 वर्तुळाचे क्षेत्रफळ  = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

 वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22 

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30

 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2

 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
 दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

घनफळ

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2   

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ
 घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2    वृत्तचितीचे (दंडगोलाचे)

घनफळ = π×r2×h

 वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2

 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची

 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πrघनाकृतीच्या सर्व

पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh

 अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h 
 समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

 दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
 (S=1/2(a+b+c) = अर्ध परिमिती) 
 वक्रपृष्ठ = πrl
 शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r(r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
 सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
 बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
 n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
 सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
 बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

आयात, चौरस, त्रिकोण, कोन :

आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी) 
       आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
 आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    
 आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी
 आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
 आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
 चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी
    चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2
 चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
 दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2
 समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2
 समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज
 समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर
 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2
 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणार्याे बाजूंचा गुणाकार/2
 पायथागोरस सिद्धांत काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2
 काटकोन त्रिकोणाचा प्रमेय 1
 कोन     300 च्या समोरील     600 च्या समोरील     900 च्या समोरील
बाजू     X                           X√3                      2X
कोन     450 च्या समोरील     450 च्या समोरील     900 च्या समोरील
बाजू     X                           X                          X√2 
 काटकोन त्रिकोणाचा प्रमेय 2
 त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 1800 असते.
 दोन कोटिकोनांच्या मापांची बेरीज 900 असते. मुळकोन = (90-कोटिकोन)0
 दोन पूरककोनांच्या मापांची बेरीज 1800 असते. मुळकोन = (180-पूरककोन)0
 मुळकोनांचा पूरककोन + कोटिकोन = [(90+2(कोटिकोन)0]
 काटकोन 900 चा असतो, तर सरळ्कोन 1800 चा असतो.

बैजीक राशीवरील महत्वाची सूत्रे :

a×a = a2
 (a×b)+(a×c)=a(a+c)
 a×b+b=(a+1) ×b
 (a+b)2=a2 + 2ab+b2
 (a-b)2=a2 +2ab+b2
 a2-b2 = (a+b)(a-b)
 a2-b2/a+b =a-b a2-b2/a-b = a+b
 (a+b)3/(a+b)2 = a+b (a+b)3/(a-b) = (a+b)2
 (a-b)3 / (a+b)2 = (a-b) (a-b)3/(a-b) = (a+b)2
 a3 – b3 = (a-b) (a2+ab+b2)
 a×a×a=a3
 (a×b)-(a×c) = a(b-c)
 a×b-b = (a-1) × b ;
 a2+2ab+b2/a+b = (a+b)
 a2-2ab+b2/a-b = (a-b)
 (a+b)3 =a3+3a2b+3ab2+b3
 (a-b)3 = a3- 3a2b+3ab2+ b3
 a3 + b3 = (a+b) (a2-ab+b2)
 :: a3+b3 / a2-ab+b2 =(a-b)
 पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार,बेरीज ,वजाबाकी.
वर्तुळ :

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्याे रेशखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
 वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या  व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
 वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
 जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्याा रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
 व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
 वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
 वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
 वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
 अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
 अर्धवर्तुळाची त्रिज्या  = परिमिती × 7/36
 वर्तुळाचे क्षेत्रफळ  = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
 वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22  
 वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
 दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
 दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

घनफळ

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
 काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
 गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
 गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
 घनचितीची बाजू = ∛घनफळ
 घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
 घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2    वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
 वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
 सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
 वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
 दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
 अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
 अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
 शंकूचे घनफळ = 1/3 πr3h 
 समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
 दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
 अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
 (S=1/2(a+b+c) = अर्ध परिमिती) 
 वक्रपृष्ठ = πrl
 शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r(r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
 सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
 बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
 n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
 सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
 बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर

1 तास = 60 मिनिटे,    0.1 तास = 6 मिनिटे,  0.01 तास = 0.6 मिनिटे1 तास = 3600 सेकंद,    0.01 तास = 36 सेकंद   1 मिनिट = 60 सेकंद,    0.1 मिनिट = 6 सेकंद1 दिवस = 24 तास = 24 × 60 = 1440 मिनिटे  = 1440 × 60 = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते
 दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.
 दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो
 तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

वय व संख्या :

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक)÷2
 लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक)÷2
 वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका :

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
 महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
 टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.