Tuesday, December 29, 2015

शाळेचे बोलके अंगण

शाळेचे बोलके अंगण

शाळेचे बाह्य रूप लहानग्यांना आकर्षित करणारे तसेच शिक्षणाची गोडी लावणारे असावे या बाबत आम्ही प्रयत्नरत राहलो आहोत त्यासाठी आमच्या कल्पनेतून शालेय परिसरात निर्माण केलेले आमचे मुक्तांगण


धुळपाटी

लहान असो किंवा मोठे प्रत्येकाचीच सहजवृत्ती असते काहींना काही रेखाटत राहण्याची याचाच उपयोग धुळपाटीत करून विद्यार्थ्याना शाळेच्या अंगणात धुळपाटी उपलब्ध करून दिलेली आहे मुले सुट्टीत येतात अक्षरे गिरवतात

शब्द समृद्धी

सुट्टीतही मुलांना काहींना काही वाचनासाठी साहित्य उपलब्ध असावे यासाठी शब्द समृद्धी उपक्रम सुरु केला आहे मुले येतात परडीतील शब्द वाचतात आपसात चर्चा करतात

स्वागत 

शाळेत प्रवेश करता क्षणीच मुले असोत व पालक त्यांची दृष्टीस चांगले विचार पडोत व सुरवात चांगल्या विचारानी घडो या साठी शाळेची  प्रवेश  रचना खालील प्रमाणे केली आहे


वर्तमानपत्र वाचन

विद्यार्थी दशेतच मुलांना वर्तमानपत्र वाचनाची सवय रुजावी त्यांना समाजाबद्दल त्यातील घडामोदींबद्दल जाणून घेऊन सजग राहण्याची सवय लागावी यासाठी शालेय परिसरात वर्तमानपत्र वाचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे मुले येतात वाचतात चर्चा करतात


वाचन समृद्ध अंगण

मुलांना मुक्त वातावरणात वाचनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वनिर्मित वाचन कार्डद्वारे  वाचन मुक्तांगण निर्माण केले आहे



शालेय परिसर अधिकाधिक विद्यार्थिभिमुख करून तो बोलका करून तो शालेय उपक्रमांशी सुसंगत बनविण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आपणास नक्कीच आवडला असेल हीच अपेक्षा

2 comments:

  1. फारच छान।पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete