Sunday, December 20, 2015

आहे ते स्वीकारा

आहे ते स्वीकारा
 आज सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियाना च्या निमित्ताने शाळा भेटी कार्यक्रम घडत आहेत यातून साध्य काय होईल हे काळ च जाणे पण या निमित्ताने राज्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सकारात्मक बदल घडणे दृष्टीपथास पडावे असे तरी किमान आज वाटत नाही त्याला कारण आहे गेल्या 8 ते 10 वर्षात शिक्षकांच्या मानसिकतेत झालेला बदल हा विलक्षण स्तब्ध करणारा आहे . मुळात कुणाची सृजनशीलता बघून ते आत्मसात करणे यात कुठलीच चुकीची गोष्ट नाही परन्तु या सर्व प्रक्रियेत शिक्षकातील स्वतः ची सहजवृत्ती  जेंव्हा संपू लागते व आहे त्या आदेशात आपली कार्यक्षमता जेंव्हा तो मापु लागतो तेंव्हा संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्ती ने याचा गांभीर्याने विचार करावा अशीच हि परिस्थिती आज निर्माण झाल्याचे चित्र आजूबाजूला नजर टाकल्यास दिसून येते.
    अमुक एका शाळेने असे केले आपलं काय आणि यातून अकारण निर्माण होणारे समज व वाढत जाणारी गुंतागुंत जेंव्हा असह्य होईल तेंव्हा आपण त्याचा विचार करणार आहोत का . मुळात शिक्षकाला विद्यार्थ्या शी फारकत घ्यायला आजची परिस्थिती का निर्माण झाली याचा आपण विचार करायला हवा आहे. 

No comments:

Post a Comment